Wednesday, September 24, 2014

70th post in English :अखंड जयां तुझी प्रीती _ Praying God to bless with company of Liberated Souls.
अखंड जयां तुझी प्रीती । मज दे बा तयांची संगति ।
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
Contact mail address is rgphadke@gmail.com


अखंड जयां तुझी प्रीती । मज दे बा तयांची संगति ।
मग मी कमळापति तुज बा नाणीं कंटाळा ॥ १ ॥
पडून राहेन तये ठायीं । उगीच संतांचिये पायीं ।
न मागे न करी कांहीं । तुझी आण गा बिठोबा॥ २॥
तुम्ही आम्ही पीडॊं जेणें । दोन्ही वारतीं एकाने ।
बैसलों धरणें । हाका देत दाराशीं ॥ ३ ॥
तुका म्हणें या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ।
न पाहिजे केला । अवघा माझा आव्हेर ॥ ४॥

Verbatim Meaning :-

O' Kamalapati, ( Bhagavan Vishnu) please let me have association of those who have intense love for you . After getting this boon , I will not demand from you anything else, so that you will not feel tired of hearing my demands || 11 ||
I assure you that I will remain at the feet of such person who has such intense love for you and will not ask you for anything || 2||

O'Viththalaa ( God) I always am asking you to give me somethings and am giving you troubles. Not only I give you trouble, I also feel bad If you grant me the boon( Association and company of the person who loves you) then both of us will be free of troubles. That is the reason I am standing at your gate and calling you|| 3||

Tuka says that O Vitthala please listen to my call and do not abandon me || 4||
Background Information to understand the meaning of the Abhanga:-
.
In the science of Spirituality, the association with a liberated souls has been given highest importance. The reason for this may be in the fact that the goal is also very lofty ( Attainment of Liberation is the goal) . This being very abstract concept in nature, it can be attained only if there is help and guidance from a soul who Himself has achieved the goal. It is the best strategy to have association of such a personality.

Such a personality is called as Saint or Seer in the Indian science of Spirituality.
We follow this approach even in our material world. For example if one wants to become PhD in some subject , then the guide and Philosopher must be the one who himself has such capability.
In spirituality y , we are searching or trying to understand our own real nature. Saint or Seer has attained this and therefore only such a saint can be the guide in the spirituality.
However it is very difficult, almost impossible to know and meet such a person. To remain in his company is further difficult. Very lucky and selected ones may get such an opportunity. But one need not feel worried about the above aspects. There is one very simple approach.

All the saints have written some or more books . This has been done by them since they very well understand the above described problems. Because of their compassion for the masses who are ignorant the saints have written such books. They are present in the form of these books. Saints have attained Liberation and thus have transcended the cycle of birth and death.. They are ever present are now in the un-manifested state. But they are also present as their books.
At least one such confirmatory description is available in the literature about the famous saint Samarth Ramadasa from Maharashtra. At the time of his departure from physical body , some of his disciple were very unhappy since they would no longer be seeing him He told the following statement is the form of Abhanga(poem)

Loosely translated it reads as follows.
Even if my physical form is no more present, still remember that I am existing as this visible wold form . Listen to me for your own benefits|| 1||
You need not run here and there. All you should do is to read my boos carefully and attentively. You will know the path for attaining Liberation. || 2||
Atmaram and Dasabodha are my literary forms. Since these are available to you you should not feel unhappy. || 3||

Same is truly applicable for all the other saints as well.
In short, to study the books written by our saints, and follow them in our day to day life, is is self the best method to remain in their company and Association

good association, good deeds, and following our own nature are to be done through the body , while performing spiritual practices such as Meditation or Recitation of Holy name of the Lord, always wishing good only for everybody, doing the worship with love are to be done though the mind. By living in this fashion in this world, definitely one will progress rapidly in his quest for Liberation.

From this background , can one understand the true message in this abhanga.
It is very difficult to get association of a liberated person .When one gets associated with such a person , naturally all his work will be done without expectations of the result , a s a worship to the lord..Therefore Sant Tukarama mahaaraj in the abhanga is requesting the Al;mighty Lord that he should bless him, with this boon. He requests for this in the very first stanza.

If we observe the reason for the worship of god by the people , we can easily see that almost everyone worships God so that he will get Wealth, Health , longevity, and everything as per the worshiper's desires.
This is like asking the King for a few coins when he is capable of giving anything.

A real disciple , who loves God does not ask for anything from the God, since he knows that Motherly nature of God. Asking anything else other than the association with God himself is useless and thus the best one can think of asking is the company and association of Holy and Liberated .

Also in our daily life , we will try to avoid a person who keeps on making some demands to us. Therefore further in the abhanga; (based on this example ) Tukaram Maharaj is telling the God that I will not do like this.
In the second stanza Maharaj is praying the God again for good association. He says that O'Vitthala, please let me have the company of the person who knows you. I will stay at such a person's feet meaning I will serve him. This is again an indication about the importance of such a good association with a holy person.
Further Tukaram Maharaj has made promise on oath that once he gets the above boon , he will ask for nothing further.

In the third Stanza an example has been sited from our day to day life. This specific stanza clearly indicates that at this stage Tukaram Maharaj is intensely desiring only for the meeting with God nothing else. In this stage of worship the disciple is needing nothing but God and it is obvious that this meeting has still not taken place. All the worship at this stage is done only because of intense love for the God.

Coming back to the example, we know that if anybody keeps on making some or other demands to us, then we get tired of such attitude and then we will avoid such persons. In short we are unhappy and the demanding person is of' cource unhappy. Both experience the state of unhappiness only.

Tukaram Maharaj is very sensitive about this aspect and he is feeling that God must be feeling same. He is worried that God will therefore abandon him,That is why in this third stanza ,Tukaram maharaj addresses the Lord, saying that O;God please fulfill my only desires of association and company of Holy saintly person. Once this demand is satisfied both of us will not experience the type of unhappiness described in paragraph prior to this one. .

The last stanza is like asking for a pardon for a commited mistake. Here Maharaj prays to The Lord that He( The Lord) should listen to what Maharaj has said in the earlier three stanzas and not abandon him.

Teaching of the Abhanga :

The abhanga brings out the importance and benefits of the Right association of a saintly person. One should have such an association and get benefited with the blessings which will take one further in the path of Liberation.

Sunday, September 21, 2014

70th A Marathi  post onअखंड जयां तुझी प्रीती । मज दे बा तयांची संगति ।
 Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
 Contact mail address is rgphadke@gmail.com .

अखंड जयां तुझी प्रीती । मज दे बा तयांची संगति ।
मग मी कमळापति तुज बा नाणीं कंटाळा ॥ १ ॥
पडून राहेन तये ठायीं । उगीच संतांचिये पायीं ।
न मागे न करी कांहीं । तुझी आण गा बिठोबा॥ २॥
तुम्ही आम्ही पीडॊं जेणें । दोन्ही वारतीं एकाने ।
बैसलों धरणें । हाका देत दाराशीं ॥ ३ ॥
तुका म्हणें या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ।
न पाहिजे केला । अवघा माझा आव्हेर ॥ ४॥

शब्दार्थ :- हे कमळापती ( लक्ष्मीपति) भगवंता , तुझ्याविषयी ज्यांच्या मनामधे प्रीती आहे , अशांची संगत मला द्यावी , मग मी आणखी कांही मागून तुम्हाला माझा कंटाळा येईल असे वागणार नाही ॥ १ ॥
मी अशा संतांच्या पायाजवळ पडून राहेन , दुसरे कांही मागणार नाही, हे तुमची शपथ घेऊन सांगतो. ॥ २॥
हे विठठला मी तुझ्याजवळ नेहमी मागत राहतो व तुला असे वागून पीडा देतो . असे करण्याने मला पण पीडाहोते व तुला पण पीडा ( त्रास) होतो. माझे वर म्हटल्याप्रमाणे जे एकच मागणे आहे ते जर तू दिलेस तर दोघांना होणारा त्रास संपेल. म्हणूनच ते मिळावे ह्यासाठी मी तुझा दाराशी धरणे देत तुला हांका मारीत आहे ॥ ३॥
तुका म्हणतो ,हे विठ्ठला माझ्या ह्या बोलण्याकडे तू लक्ष दे व माझा त्याग करू नकोस॥ ४॥

अभंगाच्या अर्थस्पष्टीकरणासाठी असणारी पार्श्वभूमी :-

अध्यात्मामधे सत्संगतीला अत्यंत महत्व दिलेले आहे. ह्याचे कारण कदाचित हे असेल की अध्यात्माचे ध्येय (म्हणजे परब्रह्माशी एकरूपता साधणे, आत्मज्ञान अर्थात मोक्ष ) साधायचे असेल तर ज्याला ते साधले आहे त्याचेच मार्गदर्शन घेणे सर्वांत उत्तम होय हा विचार 

आपण व्यवहारात सुद्धा अशाच कारणामुळे योग्य त्या गुरुंकडून मार्गदर्शन घेत असतो. जसे Phd साठी त्याच योग्यतेची व्यक्ती मार्गदर्शक म्हणुन लागते.

  अध्यात्म शास्त्र तर अव्यक्त परब्रह्माचा शोध घेण्याचे शास्त्र आहे . त्यासाठीपण ज्याला असा शोध करणे जमले आहे तोच योग्य असणार हे सहज समजू शकते. असे आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीलाच संत म्हणतात. आत्मज्ञान होणे हे करोडो मधे एकालाच झालेले असते व अशी व्यक्ती शोधणे महाकठीण काम असते.

परंतु संतानी त्यांची वाङ्मयमूर्ती ते जरी ब्रह्मरूप होऊन गेले असले तरी आपल्यासाठी मागे ठेवली आहे. ह्याबद्दल समर्थ रामदासांच्या चरीत्रामधला प्रसंग पुष्टी देणारा आहे.

समर्थांनी समाधी घेण्याच्या आधी शिष्यांना सांगितले की

माझी काया गेली खरे, परि मी आहे जगदाकारे ॥ ऐका स्वहित उत्तरे सांगेन ती ॥
नका करू खटपट । पहा माझा ग्रंथ नीट । तेणे सायुज्याची वाट ठायी पडे ॥
आत्माराम दासबोध । माझे स्वरूप प्रसिद्ध । असता न कराव खेद । भक्तजनी ॥.

हेच बाकीच्या संतांच्या साठी पण खरेच आहे.
असे ग्रंथ वाचणे व त्यात लिहिलेले समजून त्याप्रमाणे आचरण करणे ही सत्संगतच होय.

सत्संग, सत्कर्म व स्वधर्मपालन ही बहिरंग म्हणजे देहाचे आचरंण ; ह्याबरोबरच साधना करणे, सद्‍वासना व सदुपासना ह्या अंतरंग साधना करण्याने अर्थात अशा जीवनपद्धतीने राहूनच आत्मज्ञान होण्यास माणूस पात्र होतो.

ह्या पार्श्वभूमीवरून अभंगाचा अर्थ स्पष्ट होतो तो पुढे लिहित आहे.

अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :-

तुकाराम महाराजांना पण हे माहीत आहे की सत्संगत लाभणे कठीणच व म्हणूनच ते पहिल्याच कडव्यामधे ;भगवंताकडे हेच मागणे करताहेत की मला सत्संगत घडो. म्हणजे मग माझ्या कडून नि:ष्काम भक्ती घडेल.

येथे महाराजांनी भगवंताला कमलापती म्हणजे विष्णू संबोधले आहे. सर्व सॄष्टीचे लालन पालन करणारे विष्णुभगवानच आहेत. म्हणजेच ते अखिल विश्वाचे राजे आहेत. त्यांच्या मनाप्रमाणे च सर्व होत असते. म्हणून महाराजांनी भगवंताच्या ह्या रूपाला उद्देशून अभंगाच पहिला चरण सांगितला आहे.

साधारणत: माणसे भगवंताकडेव सुख , संपत्ती, दीर्घायुष्य, आरोग्य , व सर्व मला हवे तसेच होऊ दे हीच मागणी करत असतात. त्यासाठीच व्रतेवैकल्ये, पूजा ईत्यादी करत असतात. हे मागणे म्हणजे कल्पवृक्षाकडे कवड्या मागण्यासारखे आहे.
तसेच जर कोणी आपल्याकडे सतत कांहितरी मागत असेल तर आपण सुद्धा अशा माणसाचा कंटाळा करतो व त्याला टाळतो.  खरा भक्त हे समजून असतो की भगवंताकडे असे मागंणे अयोग्य आहे.
म्हणुनच महाराज पुढे म्हणतात की मी असे मागून तुला माझा कंटाळा येईल असे करणार नाही.

अभंगाच्या दुसîrÉÉ कडव्यामधे महाराज देवाकडे मागतात की मला अशा संताची भेट घडू दे मग मी त्यांच्या पायाशी आनंदाने राहीन. सत्संगतच किती महत्वाची हे येथे पुन: एकदा स्पष्ट झाले.

अशी संगत मिळाली की मी ईतर कांहीही मागण्या करणार नाही हि शपथ पण महाराजांनी घेतली आहे.

तिसîrÉÉ कडव्यांत व्यवहारातल्या दृष्टांताचा आहे. महाराजांची हा अभंग लिहितानाची अवस्था तीव्र मुमुक्षूची आहे. अ्सा मुमुक्षू फक्त भगवंताचीच कामना करत असतो. पण कामना अजून पूर्ण झालेली नसते. त्यामुळे ह्या भावनेनेच सर्भव भक्ती होत असते.
व्यवहारात आपण पहातच असतो की जर एखादी व्यक्ती सारखे कांही मागत असेल , पिच्छा सोडत नसेल तर अशामुळे ज्याच्याकडे मागणे केले जाते तो माणुस त्रासतो. मागणारा व देऊ शकणारा दोघांना त्रास पीडा होत असते. ही पीडा तेंव्हाच संपते जेंव्हा मागणी पूर्ण होते.

महाराजांना हे माहीत आहे व आपण भगवंतला सतत मागण्या करून त्रासच देतो आहे असे त्यांना मनापासून वाटल्याने त्वायाचे वाईट पण वाटते आहे. म्हणून ते येथे भगवंताला म्हणताहेत की देवा एकदाची माझी सत्संगतीची मागणी पुरी करा. मग आपला दोघांना होणारा त्रास संपेल.

अभंगाच्या चौथ्या कडव्यामधे भगवंताची प्रार्थनावजा जणू क्षमायाचनाच आहे. येथे महाराज म्हणतात की देवा माझे वर लिहिले ते म्हणणे ऐकावे व मला दूर लोटू नये.

अभंगाची शिकवण : -

शिकवण हीच आहे की माणसाने सत्संगत धरावी व स्वत:चे भले करून घ्यावे.

Wednesday, September 3, 2014

69 B th Post in Marathi अज्ञानाची भक्ति इच्छिती संपत्ती । तयाचियें चित्तिं बोध कैचा 
Blog address : http: // tukaramasteachings.blogspot.in
Contact mail address is rgphadke@gmail.com


अज्ञानाची भक्ति इच्छिती संपत्ती । तयाचियें चित्तिं बोध कैचा ॥ १॥
अज्ञानाची पूजा कामिक भावना । तयाचियें ध्यानां देव कैंचा ॥ २ ॥
अज्ञानाचें कर्म फळीं ठेवी ध्यान । निष्काम साधन तया कैंचें ॥ ३ ॥
अज्ञानाचें ज्ञान विषयांवरी ठेवी ध्यान । ब्रह्म सनतन तया कैंचें ॥ ४ ॥
तुका म्हणे जळो ऐशियाचें तोंड । अज्ञानाचें बंड वाढविती ॥ ५॥

शब्दार्थ :-
अज्ञानी माणसांची भक्ती संपत्ती साठी असते मग त्यांना भगवंत कसा भेटेल?॥ १॥
अज्ञानी जनांची पूजा सकाम असते मग त्यांना देवाचे ध्यान कसे करता येईल?॥ २॥
अज्ञानी माणसाने केलेले कर्म फळाची आशा टेवून केलेले असते, अशांना नि:ष्काम साधनाचे महत्व कसे कळेल?॥ ३॥
अज्ञानी जनांचे ज्ञानाची व्याख्या विषयांचे ज्ञान अशी असते मग सनातन ब्रह्माचे ज्ञान त्यांना कसे कळणार?॥ ४॥
तुका म्हणतो की जे लोक अशा विषयांवर आधारित ज्ञानाचे बंड वाढवतात , अशांचे तोंड जळॊ! ॥ ५॥

अभंगाचा गर्भित अर्थ समजण्यासाठी लागणारी भूमिका :-

नुकतीच गणेश चतुर्थी सर्व देशभर साजरी केली गेली. श्री.गणेशाचे रूप दोन प्रकारचे आहे. पहिले खरे अव्यक्त रूप अर्थात अध्यात्मिक रूप व दुसरे आपल्याला माहीत असलेले सगूण रूप. आपण ह्या सगुणाचीच पूजा करत असतो..
पण खरेतर गणेश म्हणजेच परब्रह्म .ॐ कार हे त्याचे प्रतीक आहे. ॐ चे पाच भाग आहेत. ) अ अक्षर जागृत अवस्था( शरीराची ) दर्शविते. ) उ अक्षर स्वप्नावथा दर्शविते ३) म अक्षर सुषुप्तिचे दर्शक आहे, ) अर्धमात्रा तुर्येचे दर्शक आहे व बिंदू उन्मनी अवथा दर्शवितो. गणेश हा ह्या सर्वापलीकडचा आहे . तोच सर्व ब्रह्मांडाचा जनक होय. म्हणजे तोच सॄष्टीमधल्या प्रत्येक प्राणिमात्रांचा , आपला खरा आईबाप दोन्ही आहे. म्हणून त्याला "गणनायक" असे पण संबोधतात.
आपण म्हणूनच कोठलेही कार्य सुरू करण्याआधी त्याचे स्मरण करून कार्यसिद्धीसाठी त्याची प्रार्थना करतो.
आपण जे सगूण रुप नेहमी पहातो ; ते ॐ कारावर आधरित आहे व त्याचा उगम गणपतीअथर्वशीर्षा मधे आहे. ह्या सगूण रुपाचा अर्थ आपल्याला ज्ञानेश्वरी मधे तसेच अनंतराम रामदासी ह्यांच्या दासबोध प्रवेश ह्या पुस्तकांमधे वाचावयास मिळतो. ॐकार सगूण व अव्यक्ताला जोडणारा तसेच भगवंताचे नाम पण आपल्याला अव्यक्ताशी जोडते. भगवंताचे अव्यक्त रूप हेच सगुणामगचे अधिष्ठान आहे हे लक्षांत घेणे महत्वाचे आहे.

अशा ह्या भगवंताचे दर्शन घ्यायचे झाले तर आपल्याला अध्यात्माकडेच वळावे लागते हे देवदर्शन झाले की माणसाच्या सर्व दु:खाचे नेहमीकरता निरसन होते. .हाच मोक्ष होय. कसे ते आता थोडक्यांत पाहूया.

सर्वसाधारणत: ईश्वराच्याकडे माणसे कां वळतात हे जर पहायचे झाले तर असे आढळते की दु:खनिवृत्ती हवी म्हणुन ईश्वराची आराधना केली जाते.
आपल्याला अनेक प्रकारची दु:खे , ताप भोगायला लागतात. उदाहरणार्थ :-
) कठीण लवकर बरे न होणारे आजार . त्यातून लवकर बरे व्हावे म्हणुन लोक भक्ति कडे वळतात.
) जेंव्हा एखादी घटना मनाप्रमाणे होत नाही तेंव्हा.
) जवळची व्यक्ती मृत्यू पावते तेंव्हा .
) कोणी आपला अपमान केला, रागावले तर.
) ईतरांना होणारा ताप पाहिल्यावर होणारी चिंता की आपल्यावर तर अशी वेळ येणार नाही नां?
) जुने गेलेले चांगले दिवस व त्यावेळच्या आठवणी आल्या की दु:ख होते.

जर यादीच करायचे ठरवले तर ही यादी कधीही न संपणारी होईल. ह्यातली कांही दु:खे शरीराला व कांही मनास होतात. मनामुळे शरीराला होhÉÉîrÉÉ दुखा:ची जाणीव होते.

ह्या व असल्या सर्व दुखा:तून आपल्यातल्या प्रत्येकाला मुक्ती म्हणजे निवृत्ती हवी असते. कांहीपासून आपल्याला तात्पुरती दुख:निवृत्ती मिळते. उदाहरणार्थ :- जर योग्य औषध घेतले तर आजार बरे होतात. पेनकिलर घेतले तर शरीरास होणारे दुख: जाणवत नाही. मूळ कारण जोपर्यंत नष्ट होत नाही तोवर ही असली दुख:निवॄत्ती तात्पुरती असते. पुढे कधीतरी पुन: आजार होतातच. हा आपला सर्वांचाच अनुभव आहे.

कारणाचा समूळ नाश करणे शक्य आहे कां ? ह्या प्रश्नावरचे उत्तर होय असेच आहे. ते म्हणजे " अज्ञानाचा नाश होणे " हे आहे. जेंव्हा अज्ञानाचा नाश होतो तेंव्हा ज्ञानोदय होतो. ह्यालाच आत्मज्ञान अशी संज्ञा अध्यात्मात आहे. असे आत्मज्ञान झाले की उरतो तो फक्त निखळ आनंद . ह्या स्थितीलाच मोक्ष हे पण नांव आहे. ह्या स्थितीपर्यंत जाणे हाच सर्व अध्यात्माचे ध्येय आहे.

तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगामधे आपल्याला अज्ञानाची म्हणजेच दुख: होण्याची ची मूळ मुख्य लक्षणे ( कारणे ) महाराजांनी सांगितली आहेत. त्यावरून आपण काय करायचे ते सहजच समजते. व जो असे समजल्यावर योग्य ते आचरन करतो त्याचे मन शुद्ध होते व तो आत्मज्ञानासाठी पात्र होतो.

येथे हे पण लक्षांत घ्यायचे आहे की जोपर्यंत आपल्याला जन्म आहे तोवर दु:ख हे सोसावे लागणारच. म्हणुन जन्ममृत्यू चक्रामधून सुटका होणे महत्वाचे ठरते. जन्म घ्यावे लागतात ह्यचे कारण अज्ञान हेच आहे. व म्हणूनच महाराजांचा हा अभंग मह्त्वाचे मार्गदर्शन करणारा आहे.

जन्म येंण्याचे कारण म्हणजे आपल्या मनाची बाह्य सृष्टीतल्या वस्तूंची आसक्ती हेच आहे. आसक्तीचेच दुसरे नांव वासना. वासना अंत:करणात बीजरूपाने साठविल्या जातत व त्यांची पूर्ती व्हावी म्हणून जीवाला शरीरधारणा करावी लागते. अर्थात जन्म झाल्याक्षणीच आपण अज्ञानाच्या वेढ्यात अडकतो.
ह्यातून सुटण्याचे दोन मह्त्वाचे मार्ग आहेत. ) ज्ञानमार्ग २) भक्तिमार्ग.

खालील प्रसिद्ध श्लोकामधे एक महत्वाचा मुद्द सांगितलेला आहे.
"आकाशात्‌ पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारान्‌ केशवं प्रति गच्छति ”
श्लोकाच अर्थ हाच आहे की जसे आकाशातून पडलेले पाणी शेवटी सागरालाच जाऊन मिळते तसेच कोणत्याही देवाला केलेला नमस्कार शेवटी केशवालाच पोहोचतो.
म्हणजेच कोणत्याही मार्गाने गेले तरी शेवटी भगवंताची भेट म्हणजे आत्मज्ञान होते.

भगवद्‌गीतेमधे भगवान श्रीकृष्ण हेच सांगतात की आत्मज्ञान झाल्याविना मुक्ती नाही.
श्रिमद्‍ शंकराचार्य प्रसिद्ध "भजगोविंदम्‌ स्तोत्राच्या शेवटच्या श्लोकान म्हणतात

कुरुते गंगा सागरगमनम्‌ । व्रतपरिपालन अथवा दानम्‌ ।
ज्ञानविहिनं कर्ममनेन । मुक्तिर्नभवति जन्म शतेन ॥

अर्थ:- माणसाने गंगेमधे स्नान केले , किंवा समुद्रस्नान केले, अथवा अनेक वेगवेगळी व्रते केली, दानधर्म केला तरी जर ज्ञान झाले नाही तर हे सर्व व्यर्थ आहे. शंभर किंवा जास्त जन्मभर जरी हे सर्व केले तरी आत्मज्ञानविना मुक्ती मिळणार नाही.
आत्मज्ञान अर्थात ज्ञान होणे म्हणजे अज्ञानाचा समूळ नाश हॊणे होय.
म्हणुनच असे म्हणतात येते की ज्ञानमार्ग असो वा भक्तीमार्ग , मुख्यत: अज्ञानाचा नाश होणे महत्वाचे आहे.

अज्ञान म्हणजे काय ह्या प्रश्नाचे उत्तर समजणे आवश्यक आहे. त्यासाठी अज्ञानाची लक्षणे समजणे हेच उत्तम. तसेच अज्ञानचा उगम कशामधे आहे तेही समजणे मह्त्वाचे ठरते. सर्व शास्त्रे, स्वनुभवी संत, वेदांत हेच सांगतो की " मीपणा , अहंकारामधे अज्ञानाचे मूळ आहे. मीपण जन्म होतक्षणीच प्रगट होतो व जीव स्वत:लाच कर्ता, भोक्ता समजू लागतो. तसेच त्याला हे दॄश्य जगत व ह्या जगामधले सर्वकांही आपल्याला खरे सुख देणारे आहे असे वाटू लागते व त्यामुळे दृश्यावर जीवात्मा आसक्त होतो. असो.

तुकाराम महाराजांचा हा अभंग ह्याच अज्ञानाच्या निरनिराळ्या रूपांचे स्पष्टीकरण करणारा आहे. एकदा कां आपल्याला हे समजले की मग पुढची कारवाई करणे सोपे जाते.

ह्या पार्श्वभूमीवरून आता अभंगाचा अर्थ काय आहे ते पाहता येते व तोच भाग पुढे दिलेला आहे.

अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :-

अभंगाच्या पहिल्या पंक्तीमधे महाराज म्हणतात की
अज्ञानाची भक्ति इच्छिती संपत्ती । तयाचियें चित्तिं बोध कैचा ॥ १॥

अज्ञानी माणसाला असे वाटते की पैसा, संपत्ती जवळ असेल तर सर्व सुखे मिळतील. परंतू खरेतर प्रत्येकाचा अनुभव ह्याच्या उलट असतो. भरपूर संपत्ति असल्यास माणूस आळशी होतो. मग स्वत:ला जी साधी कामे करता येतात ती सुद्धा नोकरचाकरांकडून करून घेतली जातात. ह्यामुळे सरतेशेवटी रोगांना आमंत्रण मिळते , दु:खच पदरात पडते.
तसेच पैसा वापरून पंचेंद्रीयांच्या आनंद भोगाकडे प्रवृत्ती वाढतेव. पण प्रत्येकाचा हाच अनुभव आहे की कोणत्याही बाह्य वस्तूकडून शरीराला मिळालेले सुख क्षणीकच असते. असे सुख भोगल्यावर त्याची आठवण चित्तमधे साठविली जाते. नंतर कांही तरी निमित्तने ती उसळते व तेच सुख परत परत मिळावे असे वाटते. पण जसेजसे वय वाढते तशीतशी शरीराची सुख भोगण्याची क्षमता कमीच होते. पण वासना उरतेच व अशा स्थितीत मृत्यू आला तर पुन: ती वासनापूर्ती व्हावी म्हणून जन्म घ्यावा लागतो. असे हे चक्र सतत चालूच रहाते. म्हणून महाराज म्हणताहेत की जर असे विचार असतील त्याला ज्ञान कसे मिळेल ? अर्थातच मिळणार नाही
एकंदरीत असे म्हणतायेते की जन्म होंणे हेच दु:खमय आहे. पुन:जन्म टाळंण्यासाठीच प्रयत्न करायला हवेत.
अभंगाच्या दुसîrÉÉ व तिसîrÉÉ पंक्तीमधे महाराज म्हणतात की
अज्ञानाची पूजा कामिक भावना । तयाचियें ध्यानां देव कैंचा ॥ २ ॥
अज्ञानाचें कर्म फळीं ठेवी ध्यान । निष्काम साधन तया कैंचें ॥ ३ ॥

येथे बरेच लोक पूजा पाठ कां करतात ह्यावर महाराजांची टिप्पणि आहे.
अनेक अज्ञानी लोक आपल्याला पूजा पाठ होम हवन करताना आढळतात. कशासाठी? तर मला देवाने आयुष्य, आरोग्य, धनसंपत्ती ईत्यादी सर्व द्यावे म्हणुन. पूजेचा संकल्प हाच असतो. ह्यालाच कामिक भावनेने केलेली पूजा म्हटले आहे. तसेच अशी अज्ञानी मंडळी जे कांही कर्म करत असतात ते कर्म पण केलेल्या कर्माचे मनाप्रमाणे फळ मिळावे ह्याच उद्देशाने केले जाते. जर तसे फळ मिळाले तर आनंद होतो नाही मिळाले तर दु:ख होते.
खरेतर पूजा ही भगवंतावरील प्रेमाने व्हायला हवी पण असा भाव असणारा एकादाच असतो.
सुरवातीला म्हटल्याप्रमाणे भगवंत सुद्धा पूजापाठाचे हवे ते फळ देतोच. पण असे फळ ईच्छिणे म्हणजे कल्पवृक्षाकडे कवड्या मागण्यासारखेच आहे. मग अशा माणसाला मुक्ती कशी मिळेल !अर्थातच मिळणार नाही.
पाँडेचरीच्या माताजींचे एक वचन आहे . माताजी म्हणतात की " प्रत्येक कर्म हे भगवंताची पूजा करतो आहे ह्या भावनेने करावे . मग साधे झाडण्याचे काम सुद्धा भगवंताची पूजाच होते व ते कर्म भगवंताजवळच नेणारे होते.”
हाच मुख्य मुद्दा वरच्या पंक्तिंमधे तुकाराम महाराजांनी सांगितला आहे.

अभंगाच्या ४ थ्या पंक्तींमधे महाराज म्हणताहेत की
अज्ञानाचें ज्ञान विषयांवरी ठेवी ध्यान । ब्रह्म सनतन तया कैंचें ॥ ४ ॥

अज्ञानी जन जगामधे कसे जगतात ते ह्या पंक्तिंमधे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. अज्ञानी माणसाचे मन नेहमीच बाह्य सृष्टिमधून मिळणाîrÉÉ ( पंचेंद्रियांच्या विषयांकडून मिळणाîrÉÉ ) सुखाकडे लागलेले असते. डोळे दृष्टिसुख ( सुंदर दिसणारी वस्तू पाहिली की मिळणारे) मागतात, कान गॊड गाणी व बोलणे मागतात, नाकाला सुगंध हव असतो, त्वचेला स्पर्शसुख हवे असते, रसनेला चवीचे खाणे पिणे हवे असते. ह्या सर्वांपासुन आनंद घेते ते मन. मन हे आपल्या " मीपणा" चाच एक भाग आहे पूर्वी मिळालेल्या आनंदाची आठवण आपल्या चित्तामधे असते ती कांही कारणाने उफाळून वर आली की मनाला तोच आनंद परत हवासा वाटतो.
सर्व हवे-नकोपण मनाचेच असते. हवीशी घटना घडली नाही, हवीशी वस्तू , भोग मिळाला नाही, मनासारखे झाले नाही की मग दु:ख होते. फार काय जुन्या आठवणिमुळे सुद्धा मन दु:खी, क्षुब्ध होते.
मृत्यूची भीती, असाध्य आजारांची भीती मनामुळेच आपण जाणतो. असो. लिहावे तेवढे कमीच असेल.
जर आपण जनावरे कशी जगतात हे पाहिले तर असे आढळते की त्यांना पण अन्न, झोप, भय व मैथून हेच व एवढेच समजते.
म्हणुनच एका सुभाषितकाराने म्हटले आहे की जर माणुस पण फक्त आहार, निद्रा, भय व मैथुन ह्याच्यासाठीच जगत असेल तर तो शिंगे नसलेला पशूच होय.
थोडक्यांत असे म्हणता येईल की अज्ञानी व पशू यांच्यामधे फारसा फरक नसतो.

म्हणुनच तुकाराम महाराज हेच सांगताहेत की अशारीतीने जगणाîrÉÉ माणसाला कधीच मोक्ष मिळणार नाही. ह्याचाच अर्थ हा की तो जन्म-मृत्यूच्या चक्रामधेच भटकत राहील.

अभंगाचा शेवटचाचरण खालील प्रमाणे आहे.
तुका म्हणे जळो ऐशियाचें तोंड । अज्ञानाचें बंड वाढविती ॥ ५॥

पण बरीच मंडळी हे सर्व थोतांड आहे वगैरे सांगून लोकांचा बुद्धीभेद करतात. अशा रीतीनेव अज्ञानाचे महत्व वाढवणाîrÉÉ अशा लोकांचे तोंड जळॊ असे उद्गार अभंगाच्या शेवटी महाराजांनी काढले आहेत. ह्याचे कारन हेच आहे की संतांना असेच वाटते की प्रत्येकाने आपल्या नरजन्माचे सार्थक मोक्षासाठी योग्य ते प्रयत्न करून घ्यावे. मोक्षानेच सर्व दु:खातून सुटका आहे.

अभंगाची शिकवण:-
आतापर्यंतच्या विवरनावरून हे स्पष्टच आहे की बाह्यसॄष्टिमधील कोणतीही वस्तू आपल्याला न संपणारा आनंद देऊ शकत नाही. प्रत्येक वस्तू नाशवंतच आह म्हणुन अशा वस्तूपासून मिळनारा आनंद पण क्षणीक म्हणजे नाशवंतच असतो.
तसेच मनाच्या हवे-नकोपणा च्या स्वभावामुळे आपण अज्ञानाच्या अंमलाखाली येतो व हे अत्यंत न-कळत घडत असते. अर्थात आपण मनाच्या आधिपत्याखाली असल्याने हे सर्व घडते. म्हणून ह्यातून बाहेर यायचा उपायच करणे आवश्यक आहे.

सर्व संतांनी एक उपाय सांगितला आहे तो खालील प्रमाणे.
उपाय मणजे भगवंताची भक्ती करणे . त्यासाठी खाली लिहिल्याप्रमाणे आचरण ठेवावे लागेल.
) हे समजून घ्यायचे की फक्त भगवंतच शाश्वत खरा आहे. बाकी सर्व( धन, संपत्ती, बयको,मुलेबाळे , मित्र घरदार ईत्यादी ) अशाश्वत आहे. म्हणुन ह्या अशाश्वताची आसक्ती ठेवायची नाही.
आसक्ती मधे अपेक्षा असतात. प्रेमामधे अपेक्षा नसतात. म्हणून सर्वांवर निरपेक्ष प्रेम असावे, आसक्ती नसावी.
) करीत असलेली प्रत्येक क्रिया ही भगवंताची पूजा आहे ह्या भावनेने करावी.
) नेहमी लक्षांत ठेवावे की कर्ता व करविता, तसेच भोक्ता पण मी नव्हेतर भगवंतच आहे.

हे सर्व एकदम जमणारे नाही पण प्रयत्न करणे आपल्याच हाती नक्कीच आहे.
मला वाटते की हीच ह्या अभंगाची शिकवण आहे.






Monday, September 1, 2014

69A th Post Abhanga:-  Ignorant worships for getting wealth |अज्ञानाची भक्ति इच्छिती संपत्ती 
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
Contact mail address is rgphadke@gmail.com

अज्ञानाची भक्ति इच्छिती संपत्ती । तयाचियें चित्तिं बोध कैचा ॥ १॥
अज्ञानाची पूजा कामिक भावना । तयाचियें ध्यानां देव कैंचा ॥ २ ॥
अज्ञानाचें कर्म फळीं ठेवी ध्यान । निष्काम साधन तया कैंचें ॥ ३ ॥
अज्ञानाचें ज्ञान विषयांवरी ठेवी ध्यान । ब्रह्म सनतन तया कैंचें ॥ ४ ॥
तुका म्हणे जळो ऐशियाचें तोंड । अज्ञानाचें बंड वाढविती ॥ ५॥

Verbatim Meaning :-

Ignorant worships for getting wealth | How can such person get True knowledge || 1||
The worship[ by Ignorant is for fulfillment of desires| How can God be the subject of his meditation || 2 ||
Ignorant concentrates on the result ( fruit) of his work| How can he understand the worship without expectations || 3|| Object of Knowledge of Ignorant is Sense objects | How can he know true God ( Parabrahman) || 4 ||
Tuka says that let the fire destroy the face of such Ignorants| They only propagate knowledge full with ignorance || 5||

Background Information For understanding the meaning of this Abhanga :-

Recently Ganesh Chgaturthy was celebrated all over the country. Sri. Ganesha has two kinds of appearances. The Real one which is not manifested. And the other one of which all worship.
Ganesha is the Parabrahman , He is represented as which has five components . The first one is representing the waking state of the body, next is the dream state. Then comes which is the state of dreamless sleep. Then comes अर्धमात्रा ( तुरिया where one is aware of the world as well as the parabrahman , next is the बिन्दु (.) representing for उन्मनि state of mind . Ganesha is beyond all this and the whole universe has originated from Him. That is why He is called “ गणनायक" the Leader of all the species. Naturally when we start any work, we pray to Him so that the task started will not have any obstructions.

Since He is not manifested , the scriptures have assumed that present appearance for Him. This has the origin in . The Ganash-atharvashirsha describes the details. Interpretation is best available in the famous spiritual book in Marathi written by Saint Jynaaneshvara Maharaj , mostly known as “ Jyaneshwari”.

To know this true God , one has to turn to spirituality. Knowing Him will free one from all the sufferings.

We know that everyone who turns to spirituality, the search for God , starts this search at least initially; in order to get a permanent relief from miseries faced in this world. The miseries faced are of many types. For example
1) Some fall ill, and suffer from some diseases.
    1. We feel miserable when some dear one passes away.
    2. When somethings do not happen as we desire, then we feel miserable.
    3. When some one insults, scolds us we are miserable.
    4. When we loose our wealth or it's part we fgeel miserable.
    5. When we see the sufferings of others ( due to say some uncurable disease ) we feel not only miserable but also worried.
    6. When we remember good old days , we lament that they are past now.
      In-fact one can go on adding to this list. It will be an unending list
      Some of the suffering are experienced by our body and mind, while some are experienced solely by our mind.
We get relief from some of these sufferings by appropriate measures such as medicines for our illness. Painkillers for body pain etc. However these reliefs are purely temporary in nature and one experiences sufferings again and again . This is the experience of each and everyone.
Thus there is cause and effect relationship for our sufferings. As long as the basic cause is not removed, there will be no end to one's sufferings.

However at least there is one approach , which guarantees a permanent relief form our sufferings. In this solution the basic cause for our sufferings is removed and naturally then; what one will experience is the Pure Bliss. This is the goal of our spiritual search for Liberation.

In this Abhanga , Tukaram Maharaj has brought-out the basic cause to our notice. This cause is called “ Ajyaana अज्ञान " or Ignorance. And since we know the cause , we can take action as well . This is what is expected . The abhanga describes the main aspects of our Ignorance. We must remember that the Ignorance arises as soon as we take birth. It is our attachment to the visual world and the objects there-in.
The ways or paths to remove this ignorance are many. These can be categorized into two types.
a) The path of Knowledge “ Dyaanmarga”
while the other path b) is “BhaktImarga “ the path of worship.

A famous Sanskrit saying is as given below.
"आकाशात्‌ पतितं तोयं , यथा गच्छति सागरं ; सर्वदेव नमस्कारान्‌ केशवं प्रति गच्छति ”
meaning is:- “ Like all waters ultimately go to the sea, any path leads to the same Parabrahmana”

Thus the worship must lead to” Atmajyanam” आत्मज्ञानम्‌ “ otherwise all the efforts are a waste of one's lifetime opportunity of having this Human birth. This is the declaration of Lord Krishna in the Srimad Bhagavadgeeta  .
Similarly in the famous Bhajagovindam Stotram, Shri. Adi Shankaracharya says the below given verse.

कुरुते गंगा सागरगमनम्‌ । व्रतपरिपालन अथवा दानम्‌ ।
ज्ञानविहिनं कर्ममनेन । मुक्तिर्नभवति जन्म शतेन ॥
the meaning of the above stanza is :- “Unless one has attained true knowledge , even for hundred Human births ; the Liberation is not possible by doing many pilgrimages, or by taking dip in the holy river Ganges or in the sea, or giving donations, or following difficult practices such as fasting ,etc.

Thus whether one follows the path of Worship, or the path of Knowledge ; it is most important that the Ignorance is fully removed.

However we must understand what this Ignorance is. The  Ignorance has its roots in the EGO. It is this “ I “ who assumes that he is the doer, and enjoyer of his actions. Fundamentally this EGO must vanish. But in order that this EGO vanishes, one has to put efforts.

The abhanga explains to us the various shades of Ignorance . So that one can decide to put his efforts in the right directions.

With this background now we can understand what Tukaram Maharaj says in the Abhanga.

Meaning of the Abhanga:-

The first stanza is
Ignorant worships for getting wealth | How can such person get True knowledge || 1||
Most of the Ignorant consider that the Wealth or Money is the only thing that will give them a  life full of pleasures and happyness. However the experience is otherwise. The Money causes one to become lazy. Many employ servants for very mundane tasks just because they have money. The body thus becomes inactive and this leads to body Diseases. With money ,one can satisfy his sence-organ needs and experience pleasure. But that pleasure  or happyness is short timed . In fact this causes generation of  the desire for more body pleasures and that leads to many births again, thus takes one away from Liberation.
Therefore we can say that the event of Birth is the source of sufferings. 

The second and third stanzas  say
The worship by Ignorant is for fulfillment of desires| How can God be the subject of his meditation || 2 ||
 Ignorant concentrates on the result ( fruit) of his work| How can he understand the worship without expectations || 3||

Many think that if they worship the God , then He will bless them with whatever they desire. In fact in most of the rituals of worships one declares before starting the worship ;s that one is performing the worship for welfare, wealth, health etc . This is called संकल्पम and the Sankalpam most of the times is for Physical welfare of one's family members,etc “ Rarely the sankalpam is for the sake of Meeting with God.! God is like the mother. He naturally gives whatever his disciple wants. But he also tries to teach us  by giving the sufferings that it is better  to worship Him not  for satisfaction of ones desires. The real worship is done without any expectations and with immense love for God.

Also if we do our work with the expectations of the friuts ( Results) then this kind of work also takes us away from God.
The Mother of Pondecherry says in one saying “ Do every act and work without expectations of it's fruits, as a worship to the Divine. Then even the simple act of cleaning the floor with a broom takes one to the Divine”.
This aspect has been addressed in the above lines.

The fourth set of lines say
Object of Knowledge of Ignorant is Sense objects | How can he know true God ( Parabrahman)
 || 4 ||
This stanza describes how an Ignorant one livesin this world. His mind is always attached to the enjoyment sourced from various sense-objects in the world. The eyes want the visuals that give pleasure, Ears want sweet music and sweet words of Praise, Appreciation etc. Nose wants sweet pleasing smells.The skin wants the sensual pleasure arising from touch. The tongue wants eatables that give pleasure. The mind is the means through which all these pleasure are enjoyed.
The mind is  also a part of  Ego, which decides what one wants and what is not wanted. If the things do not happen as per the demands of the Ego, then one feels pain, etc. One is always afraid of Death.

If we consider an animal, it also lives for food, reproduction, sleep and is always afraid of Death.

Thus there is no difference between an Ignorant one and an animal.
Tukaram Maharaj says that if one lives like this then he can never get Liberation ( meet God).

The last stanza of the Abhanga says 
“Tuka says that let the fire destroy the face of such Ignorants| They only propagate knowledge full with ignorance || 5||

Here a warning is also indirectly given. Many a Hypocrites propagate spiritual practices just  for their own worldly benefits . One should rather remain away from such a person. The teacher who expects some money or kind;  from his disciples is definitely not to be considered as the liberated one. This is the reason for Tukaram maharaj to say here with contempt that such a person who deceives the masses (under the mask of spirituality) ; should suffer,( in this last stanza.)

Teaching of the Abhanga:-

Most of the sufferings have root in the assumption that the real bliss will come from external worldly objects because our mind thinks that these will give us pleasure and happyness.
Also if our mind demands that “ Things should happen only this way or Should not happen this way “
Then it is clear that we are under the control of Ignorance.

To get over this;  the best method of worshiping God is as given below:-
a) Understand that nothing is ours including our body. Trying to remember this point will reduce our attachment to worldly objects and pleasures derived from these objects.
b) Perform every action as the worship of God without any expectation .
c)Always remember always that He is the doer not us.
To continuously remember these will definitely need continuous effort. To put such effort is in our hands!

This I think is the teaching of this abhanga.