Monday, September 23, 2013

Added 49th Abhanga आम्ही वैकुंठवासी ।  Abhanga a week of Sant Tukarama.
 Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com Contact mail address is rgphadke@gmail.com

For  Marathi Readers the explanation of the meaning is given after the English version given here ie at the end of English version.


 Abhanga 49th :-
आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी। बोलिले जे ऋषी । साच भावें वर्ताया ॥ १ ॥
झाडूं संतांचे मारग । आडराने भरले जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरला तो सेवूं ॥ २॥
अर्थ लोपलीं पुराणें । नाश केला शब्दज्ञानें ।विषयलोभीजन । साधन हे बुडविलें॥ ३॥
पिटू भक्तीचा डांगोरा । कळीकाळासी दरारा।तुका म्हणें करा । जयजयकार आनंद ॥ ४॥

Verbatim Meaning :-

We the residents of Vaikuntha have come here for this reason. To tell that whatever the seers have told is true || 1||
(We will) clean the paths shown by ( these ) saints. Since the all the paths are not visible due to the growth of a Jungle. We will eat whatever is left after the food is eaten by the saints. || 2||
The persons who are greedy and addicted to senses have taken only the outward meanings ( thus) misinterpreted the information in our Purana sand have lost their right path || 3||
( Therefore) we will loudly announce and guide the people to follow the path of Worship.
Tuka says that proclaim the glory of God. Hail the God and enjoy || 4||

Background Information :-
In our scriptures such as Upanishads, Puranas, there is vast knowledge about the way one should live in this world. Puranas contain many parables which are meant to be guide us to tread the right path in our life and reach the goal of Liberation.

However there are many such persons who have been misinterpreting this vast information, for their own benefits and such persons are misguiding the mass who are made to believe that these Hypocrites are preaching the right methods.

Tukarama Maharaj is strictly against such practices and is therefore proclaiming here the real reason for the appearance of the Saints and Seers like himself on this worldly stage.


This abhanga details the above said aspects ( cause why a saint appears once in while amongst us) .
In the recent times we have seen that Shri Ramakrishna Paramahansa, Swamy Vivekanand, Shri Shiradi Saibaba , Shri Gajanan Maharaj of Shegaon, Swamy Samartha of Akkalkot have all come here to guide us .


Meaning of the Abhanga:-

Tukaram maharaj has said in this abhanga that He also has come for the same purpose. He says that most of the knowledge has come out of the mouth ( words have to come out of mouth ) . This knowledge is just like food .
This food has been eaten by many and still some leftovers are available. He says that whatever has been told to us by various seers and saints is true.
In order to get this knowledge he is ready to even clean the paths traded by these holy souls.
This means that we should try to find the inner meaning of various Parables and learn the right path .


Just for an example in Bhagvat Purana there is a story of Damon Hiranykashyapu and his son Prahlada. Prahlada was continuously reciting the holy name of Narayana and his father tried to kill him many times. He asked Prahjlada where his narayana was. Prahlada replied that He is everywhere. Then Hiranykashyapu asked whether the Lord was present in the pillar nearby. Prahlada said Yes and the king kicked the pillar. Immediately the lord appeared and killed the demon.
The hidden meaning of this story is “ the Lord is present everywhere. If we pray to Him by believing that he is present near by then definitely our prayer will be heard by Him “


But many a people will laugh at such a story taking only the outward meaning of the words. This had been happening in the past and is even happening today around us.
Tukaram Maharaj is cautioning us to remain away from such Hypocrats.

In the last stanza he is advising us to follow the path of Worship and sing the Glory of God.

What the Abhanga teaches :-

Believe in the sayings of any of the saints and follow the path advised by them

From here onwards is the meaning of the abhanga explained in MarathI.

आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी। बोलिले जे ऋषी । साच भावें वर्ताया ॥ १ ॥
झाडूं संतांचे मारग । आडराने भरले जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरला तो सेवूं ॥ २॥
अर्थ लोपलीं पुराणें । नाश केला शब्दज्ञानें ।विषयलोभीजन । साधन हे बुडविलें॥ ३॥
पिटू भक्तीचा डांगोरा । कळीकाळासी दरारा।तुका म्हणें करा । जयजयकार आनंद ॥ ४॥

अभंगामागची भूमीका :-
आपली पुराणे, उपनिषदे इत्यादी ग्रंथांमधे ज्ञानाचा जणू खजिनाच भरलेला आहे. हे ज्ञान व्यवहारात आपल्याला जगावे कसे ते शिकवाणारे आहेच तसेच आपल्या मानवी जन्माचे सार्थक कसे करून घ्यावे हे पण सांगणारे आहे. पुराणांमधे अनेक रूपकात्मक कथा आहेत व त्यांच्याद्वारे कठीण वाटणारे वेदांतातलेच सिद्धांत समजायला सुलभ होते.
परंतू बरेच वेळा असे होते की फक्त वरवरचा अर्थ पाहिला जातो. कांही स्वार्थी मंडळी स्वत:च्या विषय भोगपूर्तीसाठी पुरांणांतल्या कथांचा भलताच अर्थ लावतात.त्यांच्या लौकीक विद्वत्तेच्या प्रभावामुळे हे लोक जे सांगतात तेच योग्य असे पण भोळीभाबडी मंडळी समजतात. ह्या दांभिकांमुळे मूळ ज्ञानाचा लोपच होतो व लोकांचे खरेतर नुकसानच होते.
तुकाराम महाराजांना अशा दांभिकतेबद्दल चीडच आहे. अशा लोकांवर विश्वास ठेवू नका व आत्मज्ञानी संताच्या उपदेशा प्रमाणे वागा असे संत ह्यासाठीच अवतरले आहेत असे ह्या अभंगात सांगतात.
वेळोवेळी असे संत आपल्या भारतभूमीमधे अवतरले आहेत हे आपण इतिहासाकडे दृष्टी टाकली तर सहज लक्षांत येते. अगदी अलिकडच्या काळामधे श्री रामकृष्णपरमहंस, स्वामी विवेकानंद , शिरडीचे साईबाबा, शेगांवचे गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामीसमर्थ होऊन गेले. हे सर्वजण तुकाराम महाराजांप्रमाणेच आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठीच आले होते हे त्यांच्या चरीत्रावरून समजते.

अभंगाचे अर्थस्पष्टीकरण:_
ह्या अभंगामधे तुकाराम महाराज सुरवातीलाच स्पष्ट करताहेत की ते स्वत:सुद्धा ह्याच कामासाथी आलेले आहेत. पुढे महाराज म्हणतात की आपल्या ॠषींनी सागितले आहे ते खरेच आहे. हे ज्ञान त्याच्या मुखातून बाहेत पडेले आहे व हे ज्ञान म्हणजेच जणू अन्न आहे.
अर्थात हे उच्छीष्ट अन्न म्हणजे ज्ञान आपण सेवन करायला काहीच आडकाठी येत नाही.
हे ज्ञान म्हणजे परमार्थाथाचा मार्ग आहे. महाराज म्हणतात की ह्यामार्गाव बरीच झाडीव जंगले वाढली आहे व महाराज स्वत: ही झाडी साफ करून मार्ग स्पष्ट दिसावा ह्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
येथे झाडी हे एक रूपक आहे. दांभिक लोकांनी पुराणाचा जो भलताच अर्थ लावून दिशाभूल केली आहे ती म्हणजेच झाडी व जंगले होय.
उदाहरणार्थ भागवतामधली भक्त प्रहलादाचीच कथा .हिरण्यकश्यपूने प्रह्लाद नारायणाचे नामस्मरण करतो म्हणुन त्याला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केले पन उपयोग झाला नाही. शेवटी त्याने अत्यंत रागाने विचारले की तुझा नारायण कोठे आहे? प्रह्लादाने सांगितले की तो तर सर्वत्र आहे , तो सर्वव्यापी आहे. तो नाही अशी कोणतीच जागा नाही. मग हिरण्यकश्यपूने खांबावर लाथ मारली व भगवंत नॄसिंहरूपे प्रगट झाले व त्यांनी हिरण्यकश्यपूच वध केला.
ह्या कथेमधून आपल्याला हेच समजावले आहे की भगवंत सर्वत्र आहे. त्याला प्रेमाने आळवले की तो भक्तासाठी अव्यक्तामधून व्यक्तरूपात येतो.व भक्ताचे संरक्षण करतो.
पण आजकाल अशा कथांना भाकड कथा म्हणून समजले जाते. दोष कथाकाराचा नाही तर कथेकडे पाहणारी जी व्यक्ती आहे तिचा आहे.
तुकाराम महाराज आपल्याला असा दोषपूर्ण दॄष्टीकोन ठेवू नका व कथेमागचे तत्वज्ञान समजून घ्या असेच ह्या अभंगात आपल्याला सांगून अभंगाच्या शेवटी सांगताहेत की म्हणूनच म्हणतो की भक्ती करा, भगवंताचा जयजयकार करून जीवन आनंदी करा. दांभिकांना ओळखून त्यांच्यापासून दोन पावले दूरच रहा हे पण महाराजांनी सांगितले आहे.

अभंगाची शिकवण :-
संताच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा व त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत रहावे.


Wednesday, September 11, 2013

Added 48th काळ सारावा चिंतने।  Abhanga a week of Sant Tukarama.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com Contact mail address is rgphadke@gmail.com

For Marathi Readers the explanation of the meaning is given in Marahti Language , after the English version ie at the end of English version.


Abhanga 48th 

काळ सारावा चिंतने। एकांतवासी गंगास्नानें । देवाचे पूजने । प्रदक्षिणा तुळसीच्या ॥ १ ॥
युक्त आहार विहार। नेम ईंद्रियांसी सार । नसावी वासर । निद्रा बहू भाषण ॥ २॥
परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥ ३॥
देह अर्पिजे देवा । भार कांहींच न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥ ४॥

Verbatim Translation :-

Spend time in contemplation . Bathe in Ganga . Live alone . Perform worship. Go around the bush of Tulasi. || 1||
Control the intake of food and movements in the world. Make control of the senses as a habit . Do not not take too much sleep or talk too much || 2||
The Spirituality is the best wealth, (it) unites ( you) with the God . These method are useful to remain in the company of God.|| 3||
Surrender the body to the God. Do not take the responsibility of anything. Tuka says (that) all will be then Bliss || 4||

Background for understanding of the Abhanga:-

When we listen to the preaching of Tukaram Maharaja , or any other saints or to the Scriptures ; it becomes clear there is God and if we are able to unite with Him then all our miseries will end. Not only there will be an end but we will also get permanent Bliss.
In fact whatever one does for achieving the above said Goal is called treading the path of Spirituality.
Our scriptures say that one must perform the first three duties ( Dharma, artha and Kama ie living to follow the righteous path, earn money to look after the family and society, grow our family) ; should one go to follow the fourth duty by renouncing the family life.
.
However our saints like Samarth Ramadasa have said that this can be achieved by changing the attitude of our mind and in that case one need not leave the family at the later stage of life.

This abhanga is giving us the guidance for doing the same.

Meaning of the Abhanga:-

Rearranging the sentences of the abhanga enables us to understand it easily..
The rearranged sentences are as given below.

Step1:- Bathe in Ganga . . Perform worship. Go around the bush of Tulasi. Live alone Spend time in contemplation .|| 1||
Step 2:- Make control of the senses as a habit Control the intake of food and movements in the world. . Do not not take too much sleep or talk too much || 2||
Step 3 :- The Spirituality is the best wealth, (it) unites ( you) with the God .
These method are useful to remain in the company of God.|| 3||
Result of following the above :- Tuka says (that) all will be then Bliss || 4||
Now the meaning of the Abhanga becomes quite clear and is described further below.

The first step in this direction is to perform pilgrimages, Different kinds of Worships , etc.
However if these are not performed with devotion then these exercises are just entertainment and are of no value.

Next step in the direction is to exercise control over what we eat ( receiving information through our five sense organs) and the type of company we keep. These should be suitable to our need of reaching the goal of Liberation. Thus Satvik type of Food and Company of like minded is always desirable.
Famous Saint Jnaneshvar Maharaj says that “ One who is a slave of Tongue , or the one who is slave of Sleeping is not entitled to tread the path of Spirituality “
Thus we can say that the Company we live with and the food intake are important.
If the input ( food, thoughts, and the information we receive mostly through our eyes, ears ) is good for the body then there is less chance for falling sick physically as well as mentally. Most of the information is received through our eyes. After it is received , the mind analyzes the same and then various desires arise in our mind. This is because of the wish for enjoying the subjects of our five sense organs. We thereafter try to satisfy the generated desires. This gives us pleasure which is generally short lived.
Another result of this is the storage of the seed of desires in our mind..This causes one to get entangled in the continuously running chain of Birth( sufferings) and death .

Therefore our scriptures are always advising us to have proper company of things and persons, preferably of God or His name.

In the abhanga Tukaram maharaj has said that one should avoid eating too much food and taking too much sleep. Here the sleep mean the attraction towards the worldly things, attraction for enjoyments from the worldly things., living the life only for this object of enjoyment . If one lives like this then one does a number of undesirable acts which are even condemned by the society ( such as Cheating our fellowmen for money, misbehave in the society , misusing the power, following corrupt practices in the life etc )

Some knowledgeable persons misuse their knowledge ( especially in the field of Spirituality ) to gain confidence of simple minded. They have no experience of the God but claim that they are very great and are Liberated souls.
Tukaram Maharaj is saying in the abhnaga to strictly avoid the above described way of living.
This is practically very difficult to implement even if there is an intense desire to do the same. This results in discontinuance of our efforts for the goal of Liberation.

For those who has understood the above aspects and has implemented at least the second step in one's daily life then for such person there is the third most important step as described hereunder.
In this step 3 he advises us to Surrender ourselves to the God. For this purpose there are two aspects to be implemented. 1) Physical part dealing with physical world 2) Mental part of the action of Surrendering .
Physical part:-
First aspect is to continuously remember that “Whatever we experience ( see, hear , smell , etc ) belongs to the God Almighty “. This has been discussed in the earlier abhangas hence is not elaborated here.
Second aspect is to also remember that “ whatever is experienced is going to get destroyed some time . Some things get changed in a short time while some take a very long time.
For example the scenic land spaces we see take a long time to change but they do change.
Nothing is permanent and stable in this world.

Living by the above two aspects , enables us to become free from the feeling of Loss. ( The loss of money, friends, near and dear ones etc) . In spirituality , this thinking helps us to be free from desires .Thus these ways are helpful in day to day living as well as spiritual way of living.

Third aspect is see the presence of God in everything. This is very important. If we follow this then we will not speak harsh words with anyone. Similarly we will not spoil the Nature and environment of our mother planet Earth. .
Mental Part of Surrendering :
Here we continuously try to remember that “ God gets the actions done through us. Thus he is the real doer of all the actions. If we do some action thinking that we are the doers, then such action is connected with expectations of some results. Not getting the results makes us unhappy. But leaving the results to God removes the chance of us feeling unhappy. Expectations are nothing but desires in some other form. Desires are the cause of getting entangled in the viscous cycle of birth and death.
Thus if we follow the second aspect ( part) it enables us to live in this world peacefully as well as takes us near to the desired goal of Liberation.
In the abhanga this is called as Surrendering our Body and not carrying any weights.
Best is to remember Him always. We are all many but He is the unique one and alone. Following both Physical as well as Mental Surrender means leaving in His company.
To reach this step means getting connected with the God. Tukaram Maharaj has said that this is the best way.
Following this route / path leads one to get immersed in Pure Bliss (Liberation) forever.

Teachings of this Abhanga :

Abhanga enables us to examine how we are living presently and do necessary changes if required.

Further Down below is the Marathi vesrion written for the Marathi readers.
अभंग ४८ वा
काळ सारावा चिंतने। एकांतवासी गंगास्नानें । देवाचे पूजने । प्रदक्षिणा तुळसीच्या ॥ १ ॥
युक्त आहार विहार। नेम ईंद्रियांसी सार । नसावी वासर । निद्रा बहू भाषण ॥ २॥
परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥ ३॥
देह अर्पिजे देवा । भार कांहींच न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥ ४॥

अभंगा मागची भूमिका :-
तुकाराम महाराजांचे अभंग ऐकल्याने व त्यांवर मनन केल्याने अथवा इतर कोणत्याही संताचे वाङ्मय वाचल्याने किंवा इतर कांही कारणाने आपल्याला हे नक्कीच लक्षात येते की भगवंत आहेच व त्याची भेट झाली तर आपल्या सर्व दु:खांचा नाश होऊन शाश्वत सुख मिळेल. ह्यालाच मोक्ष मिळणे असेही म्हणतात. ह्यासाठी माणूस जेजे प्रयत्न करतो त्यालाच परमार्थ साधन म्हणतात.
धर्म, अर्थ, काम ह्या पुरुषार्थांनंतरच शास्त्रे मोक्षासाठी संसार सोडावा ह्याची परवानगी देतात.
आपल्या संतांनी स्वानुभवावर हेच अत्यंत ठामपणे सांगितले आहे की सर्वसामन्यांनी भगवंतासाठी प्रपंच सोडायची मुळीच आवश्यकता नाही .
समर्थ रामदास स्वामी दासबोधामधे एके ठिकाणी म्हणतात की
"संसारत्याग न करिता । प्रपंच उपाधी न सांडिता ।परमाथात सार्थकता ।विचारेची होये।"”

तुकाराम महाराजांचा हा अभंग हेच कसे साधायचे त्याच्यावरच मार्गदर्शन देणारा आहे.
एकूण मुख्य मुदा हाच आहे की आपण प्रपंचामधे राहून पण माणुस परमार्थसाधन करू शकतो.

अभंगाचे सविस्तर अर्थस्पष्टीकरण :-
स्पष्टिकरण करणे सोपे जावे म्हणून अभंगाच्या चरणाचे वाचन खाली दिलेल्या क्रमाने करता येते.

गंगास्नानें । देवाचे पूजने । प्रदक्षीणा तुळसीच्या ।
युक्त आहार विहार। नेम ईंद्रियांसी सार । नसावी वासर । निद्रा बहू भाषण ।
देह अर्पिजे देवा । भार कांहींच न घ्यावा । एकांतवासी काळ सारावा चिंतने ।
परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे । तुका म्हणे आघवा होईल आनंद ॥
येथे पायरी पायरीने आपल्याला मार्गदर्शन आहे.

अगदी सुरवातीची पायरी म्हणजे तीर्थयात्रा कराव्या. देवाची पूजाअर्चा तुळशीला प्रदक्षिणा घालाव्या. हे ज्याला शक्य आहे व ज्याची ह्यावर श्रद्धा असेल त्याने हे सर्व जरूर करावे.पण श्रद्धेविना हे सर्व करणे फक्त मनोरंजनच होईल.
नंतरची पायरी म्हणजे आपला आहार व विहार योग्य असावा.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की : जो रसनेंद्रियाचा अंकिला। कां निद्रेसी जीवें विकला । तो नाहींच एथ म्हणियेला । अधिकारिया ॥ म्हणजेच युक्ताहार महत्वाचा आहे.
योग्य आहार असेल तर शरीरास रोग होण्याची शक्यता कमी असते. विहार म्हणजे जगामधे वावर. जगांत वावरतांना आपल्या दृष्टीद्वारेच मुख्यत: निरनिराळे विषय मनामधे प्रवेश करून मनामधे भोगांची वासना निर्माण करतात. मग वासनापूर्तीच्या मागे जाणे घडते. वासनापूर्तीमुळे आनंद पण मिळतो पण तात्पुरताच !
वासनेचे बीज मात्र तयार होते व ह्यामुळे पुढच्या जन्माची तयारी नकळत होते.
म्हणून शक्यतो ज्यामुळे वासनांचे उद्दिपन होणार नाही हेच प्रयत्न असावे असा उपदेशच सर्व संत तसेच शास्त्रांमधे केलेला आहे.
प्रत्यक्षांत असे सर्व कांही मनाप्रमाणे क्वचितच जमते. त्यामुळे मनात असले तरी परमार्थ साधन होत नाही . प्रपंचामधे वर लिहिलेली जीवनपद्धत ठेवणे सोपे नाही हेच खरे आहे.
तसेच जर आकंठ भोजन केले तर झोप लागते. अशी निद्रा टाळावी असे अभंगात म्हटले आहे. येथे निद्रा म्हणजे बाह्य जगाला भुलणे. आपला देह फक्त विषयभोगांसाठीच आहे असे वाटल्यामुळे त्याच्या सुखासाठीच सर्व प्रयत्न करणे. करावे तसे भरावे लगेल हे विसरून जे करायला नको ते करणे म्हणजेच आकंठ जेवणे.
तसेच काही दांभिक मंडळी आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगून उपदेश करत असतात. ह्यांना भगवंताचा प्रत्यक्ष अनुभव शून्यच असतो. असे बहू भाषण टाळा असे अभंगात म्हटले आहे.


म्हणूनच अभंगात पुढची महत्वाची पायरी सांगितली आहे .
ह्यापुढची पायरी म्हणजे जड व चंचळ आत्मनिवेदनाची. " .देह अर्पीजे देवा" असे अभंगा येते.
आपल्याला जे जे दिसते , ज्याचा ज्याचा अनुभव येतो ते सर्व कांही देवाचे आहे तसेच सर्व कांही भगवंताचीच रुपे आहेत हे भान ठेवणे शिकायला हवे. तसेच "जे जे दिसते ते कधीतरी नष्ट होते " हा ह्या दृश्याचा गुणच आहे" हा स्रूष्टीनियम पण भगवंतानेच केला आहे.
हे सर्व ध्यानात ठेऊन व समजून वागणे. ह्यालाच जड आत्मनिवेदन म्हणतात.
व्यवहारामधे ह्याविचारसरणीचा अभ्यास करून ती आचरणामधे आली तर सर्व प्रयत्न करून मिळवलेली संपत्ती जर गेली, मित्र किंवा नातेवाईक सोडून गेले तेंव्हा मनाला होणाîrÉÉ दु::खाची तीव्रता कमी होते. परमार्थामधे ह्याचा फायदा म्हणजे जन्माचे कारण असणारी आसक्ती सुटते.
त्याच प्रमाणे जो सर्वांभूती भगवंत पाहील तो दुसîrÉÉला कटू बोलून वा वाईट वागून दुखावणार नाही. " "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे " ही भावना असल्याने पर्यावरणाचे नुकसान करणार नाही. तुळशी प्रदक्षिणा ह्या साठीच सांगितल्या असाव्यात.
आत्मनिवेदनाचा दुसरा भाग म्हणजे "सर्वकर्ता भगवंत" ह्याभावने नुसार वागणे. ह्यालाच कांही चंचल आत्मनिवेदन असे नांव आहे.
एकदा कां हे कळले की कर्ता करविता भगवंतच आहे. तोच आपल्याला योग्य ती ऊर्मी देतो व आपल्याकडून कांही कार्य करवून घेतो; की रोजच्या व्यवहारात जेंव्हा कार्याचे फळ ( results) अपेक्षेप्रमाणे मिळत नाहीत तरी त्याची खंत वाटणे कमी होते..परमार्थांत फलेच्छा नसल्याने पुढच्या जन्माची कारणेच उरत नाहीत. ासा दोन्हीकडून फायदाच आहे. ह्यालाच देह अर्पण करणे व भार न घेणे असे अभंगात म्हणलेले आहे.. ह्याच्यासाठी मनाने त्याचे स्मरण करत कार्य करणे , त्याच्या बरोबर राहणे हाच अभंगातला एकांतवास होय

ह्या पायरीवर येणे म्हणजेच परमार्थ साधन होय. भगवंताशी जोडले जाण्यासाठी हाच एक उपाय आहे असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.
असे वागणे घडले की काय मिळते तर शाश्वत समाधान व न मिटणारा आनंद अर्थात मुक्ति.
हेच महाराजांनी शेवटी सांगितले आहे.

अभंगाची शिकवण :-
असे आपण वागतो आहोत कां हे प्रत्येकाने तपासून पाहावे व योग्य ती सुधारणा वागणुकीत करावी हेच आपण येथे शिकतो.